HW News Marathi
महाराष्ट्र

नरेंद्र पाटलांचं ठरलं ! फडणवीस सांगतील तेव्हा भाजपात प्रवेश करणार..

सोलापूर | माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी नुकताच शिवसेना सोडल्याचा आपला निर्णय जाहीर केला होता.त्यानतंर आता त्यांनी आपण भाजपात जाणार हे स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा आपण भाजपात प्रवेश करणार असे त्यांनी आज सोलापुरात सांगितले आहे.आपल्याविरोधात मुख्यमंत्र्यांना भडकवण्यात महाविकास आघाडीतील नेते यशस्वी ठरले,असे वक्तव्य माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केले.

फडणवीसाDevendraचं कौतुक तर उद्धव ठाकरेंवर टिका

देवेंद्र फडणवीस यांनी मी राष्ट्रवादीत असताना देखील माझी महामंडळावर नियुक्ती केली होती. त्यांच्या सांगण्यावरुन मी शिवसेनेकडून खासदारकी लढवली. आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवे होते. मात्र त्यांनी महामंडळ बर्खास्त केले. असे स्पष्टीकरण नरेंद्र पाटील यांनी दिले. तसेच यापुढे भाजपसाठी काम करणार असून देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा पक्ष प्रवेश होईल असे देखील नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

उदयनराजेंच्या गळाभेटीबाबात आणि ‘साहेब मुख्यमंत्री होणार’ याबाबत काय म्हणाले नरेंद्र पाटील ?

नरेंद्र पाटील म्हणाले ,प्रवासात असताना योगायोगाने उदयनराजे भोसले यांची भेट झाली. राज्यातील अस्थिर वातावरण पाहता स्थिर व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा असे मी मनमोकळेपणाने बोललो. पण पहाटेचा शपथविधी होणार की दुपारचा शपथविधी होणार हे मी सांगू शकत नाही. कोणतेही तर्कवितर्क लावायला मी काही ज्योतिष नाही. सामान्य कार्य़कर्त्याच्या मनातील भावना मी व्यक्त केली.

अशोक चव्हाणांवर सडकून टिका

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला. अशोक चव्हाण यांच्यामुळेच मराठा आरक्षणाला धक्का लागला. आरक्षण देण्यामध्ये शिवसेना ही भाजपसोबत होती. मात्र महाविकास आघाडीत अशोक चव्हाण यांना समितीचे अध्यक्ष करण्यात आले. मराठा समाजातील विविध संघटनानासोबत घेणे ही अशोक चव्हाणांची जबाबदारी होती. मात्र न्यायालयाकडून स्थगिती मिळेपर्यंत त्यांनी कोणालाही जवळ केले नाही,अशी टिका त्यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबा या वयात मी फिरतोय तु किमान घराबाहेर पड, असं शरद पवारांना म्हणायंचं असेल – चंद्रकांत पाटील

News Desk

नारायण राणेंचा डंका ! मंत्रीमंडळाच्या पहिल्या रांगेत,यादीतही पहिलचं नाव…

News Desk

नवाब मलिकांचा ‘त्या’ भाजप नेत्याच्या मेहुण्याबाबतचा गौप्यस्फोट

News Desk