HW News Marathi
महाराष्ट्र

२४ तासांत नाशिकमध्ये ५७० मि.मी. पावसाची नोंद

नाशिक | नाशिक परिसरात शनिवारी (७ जुलै) मध्यरात्रीपासून संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिकामधील जोरदार पाऊसामुळे गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात नाशिकमध्ये ५७० मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर दुसऱ्याबाजुला हवामान खात्याने येत्या तीन तासात जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून शहरात दमदार पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. या पावसात ग्रामीण भागात काही ठिकाणी फरशी पुलांवरून पाणी गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे, तर काही भागातील रस्तेदेखील खचले आहेत. पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात १६० मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. गंगापूर, पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावल्याने धरणांमधील पाणी पातळीत वाढ झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सिन्नर तालुक्यात दमदार पाऊस सुरू असल्याने येथील नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेच्या इशारा दिला आहे. त्र्यंबकेश्वरला १६० मि.मी. पावसाची नोंद झाली, तर पेठ येथे १०१ मि.मी. पाऊस नोंदला गेला. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असताना इगतपुरीत मात्र अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शुभमंगल होण्यापूर्वी नवरदेवाचा मृत्यू

News Desk

केडीएमसी महापालिकेत नगरसेवक भिडले

News Desk

राज्याच्या दृष्टीने पुढचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे, कोरोना ‘हे’ जागतिक संकट !

swarit