HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिक महापालिकेच्या दोन्ही अतिरिक्त आयुक्तांचा बदलीसाठी विनंती अर्ज

नाशिक | कर्तव्यनिष्ठ आणि कडक शिस्तीचे आयएएस अधिकारी अशी ओळख असलेले विद्यमान महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे मनपातील अनेक अधिकारी कर्मचारी तणावात असल्याची चर्चा आहे. त्यातच दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी बदलीसाठी अर्ज केला आहे. मुंढे कायद्यावर बोट ठेवून कारवाईचा धडाका जातील तिथे सुरु करत असतात. त्यामुळे आरामदायी कारभाराची सवय झालेल्या कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंची भीती असते.

पुण्यातही पीएमपीएमएलमध्ये मुंढेंनी अनेक धाडसी निर्णय घेतले, तेथेही अनेक वाद झाले. त्यांच्या कडक शिस्तीचा पुण्यातही परिणाम दिसू लागला, मात्र तोच त्यांना नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी पाठवण्यात आले. नाशिकमध्येही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत आपल्या कामाचा धडाका सुरु केला.

कामात शिस्त, कर्तव्यात कोणतीही कसर न सोडणे इत्यादी गोष्टींमुळे कर्मचाऱ्यांच्या मनात कायमच तुकाराम मुंढेंबद्दल एक नाराजी दिसून आली आहे. आता नाशिक महापालिकेतील दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी बदलीसाठी विनंती अर्ज केल्याने मोठी खळबळ माजली आहे. आता या विनंती अर्जावर काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“निवडणुकीतील आमिषाला राजेश कदम बळी पडले असावेत” –  राजू पाटील

News Desk

१९ वर्षीय तरुणीवर नालासोपारामध्ये सामूहिक बलात्कार, एक जण पोलिसांच्या ताब्यात

Aprna

“उडता पंजाब’ नंतर ‘उडता महाराष्ट्र’ करण्याचा कट होता” – नवाब मलिक

News Desk