HW News Marathi
महाराष्ट्र

मोठी बातमी ! पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची थेट पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

पुणे | पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पदोन्नती मिळाली आहे. आता त्यांची थेट पंतप्रधान कार्यालयात उप सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र पंतप्रधान कार्यालयाने जारी केले आहे .पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून पुढची ४ वर्षे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्या आधी त्यांनी जिल्हाधिकारी पदाच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करत ही नवीन जबाबदारी घ्यावी अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच, रुजू होण्याचे पत्र दिल्यापासून ३ आठवड्यांच्या आत कामावर रुजू होणे गरजेचे आहे असे देखील पत्रात नमूद करण्यात आली आहेत.

नवल किशोर राम यांची कारकीर्द कौतुकास्पद राहिलेली आहे. देशातील सर्वोत्तम ५० जिल्हाधिकाऱ्यांमध्ये त्यांची निवड झाली होती . फेम-इंडिया आशिया पोस्ट लोकप्रिय जिल्हाधिकारी सर्वेक्षण २०२० मध्ये त्यांनी स्थान पटकावले आहे . कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी उत्तम कामगिरी केल्याची पाहायला मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२००९-१० च्या शेतक-यांनाही आता कर्जमाफीचा लाभ मिळणार

News Desk

पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती! – मुख्यमंत्री

Aprna

देवेंद्र फडणवीस बोलतात त्या सगळ्याच गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज नाही – संजय राऊत  

News Desk