HW News Marathi
महाराष्ट्र

“मी एनसीबीला आव्हान देतो की त्यांनी…”, – नवाब मलिक

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबी यांच्यातील वाद आता अधिकाधिक तीव्र होऊ लागला आहे. एनसीबीनं २ ऑक्टोबर रोजी छापा टाकून आर्यन खानसह इतर आरोपींना अटक करणं हा बनाव असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केल्यानंतर एनसीबीनं देखील पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. या पार्श्वभूमीवर आता नवाब मलिय यांनी थेट एनसीबीला आव्हानच दिलं आहे. एनसीबीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकूण १४ लोकांना ताब्यात घेतलं असून ६ लोकांना सोडल्याची माहिती दिली आहे. त्यावर आता नवाब मलिक यांनी एनसीबीवर निशाणा साधला आहे.

ही सगळी कारवाई म्हणजे बनाव आहे

“मी म्हटलो ११ पैकी तिघांना सोडलं. एनसीबी सांगतंय ११ नाही, १४ लोकं होते. आम्ही सगळं फूटेज पाहिलं. तीन लोक सोडल्यानंतर हे फूटेज आम्ही जगासमोर आणलं आहे. मी एनसीबीला आव्हान करतो, की जर १४ लोकं होते, तर आणखीन तीन लोकं कोण होते ते त्यांनी जाहीर करावं. तुमच्या ऑफिसमधून ते लोकं बाहेर पडतानाचं फुटेज जाहीर करा. तेव्हा तिथे चॅनलची लोकंही होतीच. भाजपाच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर ३ लोकांना सोडलं आहे. ही सगळी कारवाई म्हणजे बनाव आहे असं मी पुन्हा म्हणतो”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

“काही लोक मला १०० कोटींच्या नोटिसा पाठवणार सांगतायत. मी वाट पाहतोय त्या नोटिशीची. एवढी माझी ऐपत आहे. भाजपाने माझी ब्रँड व्हॅल्यू १०० कोटी ठरवली यासाठी मी त्यांचे आभार मानतो. काल मोहित कंबोज म्हणाले नवाब मलिक भंगारवाला आहे. मला अभिमान आहे. माझे वडील आणि काही दिवस मी देखील भंगारचा व्यवसाय केला. कायदेशीर व्यवसाय करणं याचा मला अभिमान आहे, मी कोणत्याही मार्केटला बुडवलं नाही, सोन्याची तस्करी केली नाही, सोन्याच्या बाजारात फसवेगिरी केलेली नाही”, अशा शब्दात नवाब मलिक यांनी मोहीत कंबोज यांना देखील टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुन्हा एकदा लोकल रेल्वे टार्गेट : रेल्वे पोलिस सतर्क

News Desk

महाराष्ट्राला पुन्हा विकासपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प – नाना पटोले

News Desk

अजित पवार आणि अनिल परबांची CBI चौकशी करा, चंद्रकांत पाटलांचे थेट अमित शहांना पत्र

News Desk