HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र

“…मग नवाब मलिक तुम्हीही मंत्रिपदाचा राजीनामा द्या”, दरेकरांचं आव्हान

Nawab Malik - Pravin Darekar

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. लखीमपूर खेरी येथे रविवारी (३ ऑक्टोबर) केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राच्या वाहनांच्या ताफ्याखाली चिरडून चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर, देशभरातून केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही अशीच मागणी केली होती. दरम्यान, यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नवाब मलिकांना आव्हान दिलं आहे. “मलिक यांच्या जावयालाही ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. मग मलिकांनीही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”, अशी मागणी दरेकरांनी केली आहे.

प्रविण दरेकरांनी ट्विटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांच्यावर बोचरी टीका केली आहे. “एनसीबीने तुमच्या जावयाला देखील ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक केली होती. मग आता तुम्हीही राजीनामा द्यावा किंवा सरकारनेच नवाब मलिकांचे मंत्रीपद काढून घ्यावं”, असं ट्विट दरेकर यांनी केलं आहे. दरम्यान, लखीमपूर हिंसाचार प्रकरणानंतर तब्बल आठवड्याभराने उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी (९ ऑक्टोबर) रात्री आशिष मिश्राला अटक केली. त्यानंतर, आज (११ ऑक्टोबर) त्याच्या पोलीस कोठडीत ३ दिवसांची वाढ देखील करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणी अजय कुमार मिश्रा यांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी तीव्र मागणी होत आहे.

नवाब मलिक काय म्हणाले?

लखीमपूर प्रकरणी नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत आशिष मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार केली आहे. “लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा हात असतानाही कारवाई होत नव्हती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर त्याला अटक झाली. मुख्य म्हणजे गृहराज्यमंत्र्यांच्या गावातच ही घटना घडली आहे. त्यामुळे, अजय कुमार मिश्रा यांनी राजीनामा दिलाच पाहिजे किंवा केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे”, असं नवाब मलिक म्हणाले.

“मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा…?”

“ज्यांनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का? लखीमपूर घटना निंदनीय आहेच. पण मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला गेला. त्यावेळी त्यांना जालियनवाला बाग आठवला नाही का?”, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्याचसोबत, “आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे”, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

Related posts

छगन भुजबळांवर शिवसेनेची बॅनरमधून जहरी टीका

News Desk

राजीनामा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मागितला पाहिजे, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा  

News Desk

अरुण जेटली एम्स रुग्णालयात दाखल

News Desk