HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिकांचं नवं ट्विट, ‘ज्ञानदेव’ की ‘दाऊद’ तर वानखेडेंचं स्पष्टीकरण

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला होता. मात्र, समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हा दावा फेटाळून लावला होता. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी आणखी एक छायाचित्र ट्विट करुन वानखेडे पिता-पुत्रांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका फेसबुकचा प्रोफाईल पिक्चर शेअर केला आहे. यामध्ये समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांचे छायाचित्र दिसत आहे. मात्र, या प्रोफाईलवर वानखेडे दाऊद असे नाव लिहले आहे. त्यामुळे ज्ञानदेव वानखेडे की दाऊद वानखेडे या संभ्रमात आणखीनच वाढ झाली आहे. आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

कुणीतरी गैरवापर करुन किंवा बनावट केलं

मात्र नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर आता समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या सर्व आरोपांचे खंडन केले होते. माझं नाव दाऊद पहिल्यापासूनही कधी नव्हतं. आताही नाही. जन्मल्यापासून माझं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे. शाळेत जाण्यापासून, कॉलेजला जाण्यापासून, एलएलबीला प्रवेश घेण्यापासून, डिपार्टमेंटला जाण्यापासून, रिटायर होण्यापासून माझं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. हे कुणीतरी गैरवापर करुन किंवा बनावट केलं असेल, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही किंवा माहितीही नाही, असे स्पष्टीकरण समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दिले होते.

क्रांती रेडकर याचं उत्तर

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबी झोनल डिरेक्टर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले आहेत. अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक समीर वानखेडे यांच्याविरोधात आरोप प्रत्यारोप करत आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे दलित नसून ते मुस्लिम असल्याचा आरोप केला.मलिकांच्या आरोपावर समीर वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने उत्तर दिले आहे. क्रांतीने एक ट्विट करत त्यात समीर आणि तिच्या लग्नाचे काही फोटो पोस्ट करत समीर हिंदू असल्याचे म्हटले आहे. आमचे लग्न देखील हिंदू रितीरिवाजाप्रमाणे झाले आहे. आम्ही दोघेही सर्व धर्मांचा आदर करतो असे म्हणत क्रांती रेडकर हिने नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चांदणी चौक परिसरातील जुना पूल पाडून रस्त्याच्या मार्गिकेचे काम त्वरित करण्याचा निर्णय

Aprna

पिंपरीतील कोरोनाग्रस्त होत आहेत बरे, ५ जणांना आज मिळाला डिस्चार्ज

swarit

ही वेळ आणीबाणीची, शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा – राज ठाकरे

News Desk