HW News Marathi
देश / विदेश

छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांकडे पाकिस्तानी लष्कराची शस्त्रे ?

छत्तीसगड | छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडे पोलिसांना अमेरिकी बनावटीची जी-३ रायफल सापडल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तानी सैन्याकडून या शस्त्रांचा वापर केला जातो. त्यामुळे, या नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून शस्त्र पुरवठा केला जात असावा असा संशय सुरक्षा दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांकडून खात्मा करण्यात आलेल्या जवानांकडे १ एसएलआर रायफल, एक ३०३ रायफल, एक १२ बोर रायफल आणि काडतुसे सापडली आहेत. या चकमकीत पोलिसांना सापडलेल्या अमेरिकन बनावटीच्या जी-३ रायफल्समुळे नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून मदत, शस्त्रसाठा पुरविला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कारण, पाकिस्तानी लष्कराकडून देखील याच रायफल्सचा वापर करण्यात येतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर नरेंद्र मोदी, शरद पवार, राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिली

Aprna

बीडच्या जवानाचा पंजाबमध्ये अपघाती मृत्यू

News Desk

पवारांच्या त्या ९ ट्विट्सना केंद्रीय कृषीमंत्र्यांचे सडेतोड उत्तर

News Desk