HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपला आता ‘जय’ चालत नाहीत, जयसिंगराव गायकवाड यांच्या राजीनाम्यावरून मुंडेंची टोलेबाजी

परभणी | ५६ आमदार असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री, ५४ आमदार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री, ४४ आमदार असलेल्या काँग्रेसचे मंत्री आणि सर्वाधिक १०५ आमदार असलेला भाजप विरोधी पक्षात ही केवळ लोकशाहीची ताकत असून ही किमया करणारे शरद पवार यांनी भाजप नेत्यांमधून आत्मविश्वास काढून घेतला आहे, पराभूत मानसिकतेत भाजप पदवीधरची निवडणूक लढवत आहे, असे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परभणी येथे आयोजित पदवीधर व कार्यकर्ता मेळाव्यात मुंडे बोलत होते.

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित

धनंजय मुंडे यांच्या आधी नव्यानेच भाजपला सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मंचावर येऊन आपल्या भाषणातून आपल्या व्यथा मांडल्या. श्री गायकवाड यांनी भाजपने अनेक वर्ष आपल्यावर अन्याय केला असून, आता पूर्वीची भाजप उरली नाही, नव्याने आलेल्या नेत्यांनी मला राजकारण शिकवू नये असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली; आपण लवकरच आपल्या मूळ घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचेही गायकवाड यांनी यावेळी जाहीर केले.

भाजपला ‘जय’ आजकाल चालत नाहीत !

भाजपला धनंजय, जयसिंग यांच्यातले ‘जय’ आजकाल चालत नाहीत, त्यांना गोपीनाथ, एकनाथ यांच्यातले ‘नाथ’ही चालले नाहीत त्यामुळे भाजपला प्रत्येक निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे असे धनंजय मुंडे म्हणाले. मराठवाडा पदवीधर ची निवडणूक लढण्याआधीच भाजप पराभूत मानसिकतेत असून, ३५ उमेदवार रिंगणात असताना आपल्यातील बंडाळी शमवण्यापेक्षा भाजप नेतृत्वांनी सतीश चव्हाण या नावाचे उमेदवार उभे करून आपली शक्ती क्षीण झाल्याचे सिद्ध केले आहे. अशा कृतीला सुशिक्षित मतदारांनी मतपेटीतून आपले प्रत्युत्तर द्यावे व सतीश चव्हाण यांना विक्रमी मतांनी विजयी करून हॅट्ट्रिक साधावी असे आवाहनही उपस्थितांना केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाणी टंचाई असेल तेथे तातडीने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर द्या! – बाळासाहेब थोरात

Aprna

कष्टकरी ऊसतोड कामगरांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न!– अजित पवार

Aprna

ओमिक्रोनबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची महत्त्वाची माहिती!

News Desk