HW News Marathi
महाराष्ट्र

“सत्तेत आहात की विरोधात? गोंधळलात का?”, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

परळी । सत्ताधारी म्हणतात की सरकार टिकेल तर विरोधी पक्षातले नेते रोज सरकार पडणार असल्याचे दावे करतात. त्यामुळे, हा प्रकार हे थांबवला पाहिजे असा सल्ला आज (१५ ऑक्टोबर) माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भगवान भक्तीगडावर झालेल्या दसरा मेळाव्यातील भाषणातून दिला होता. पंकजांच्या या सल्ल्यावर आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सवाल उपस्थित केला आहे. “विरोधी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. पण त्या त्यांच्या पक्षातील नेत्यांशी विसंगत बोलतायत आणि सल्ले देतायत. त्या गोंधळल्या तर नाहीत ना?”, असा मिश्किल सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे .

अखेर पंकजांनी दिली अपयशाची कबुली!

“ऊसतोड कामगार महामंडळासाठी आमच्या सत्ता काळात मला हवं तसं काम करता आलं नाही, आता कामगारांची नोंदणी प्रत्यक्षात सुरू झाली आहे. पण सत्ताकाळात काही करता आलं नाही”, असं म्हणून पंकजा मुंडे यांनी आपल्या अपयशाची जाहीर कबुलीच दिली आहे. त्यावेळी तुमचं तीन-तीन खात्यांचं मंत्रिपद कुणाला भाड्याने दिलं होतं?” असा सवाल उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
आम्ही मात्र ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग केल्यापासून सातत्याने राज्यातील ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत व आता त्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. त्यामुळे आम्ही ‘अकल्याणकारी’ आहोत का ‘कल्याणकारी’ हे येणाऱ्या काळात जनता ठरवेल”, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

व्यसनमुक्तीसाठीच्या संकल्पाच स्वागतच

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी व्यसनमुक्तीबाबत जाहीर केलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले की, “व्यसनमुक्ती हा माझ्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येतो. या सत्कार्यासाठी त्या योगदान देणार असतील तर त्यांचं स्वागत व आभार मानतो.”
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रुग्णालयातून डिस्जार्च मिळाल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा कामावर रुजू

Aprna

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी इन्फोसिसची होणार मदत

Aprna

महात्मा गांधींविषयी ‘ते’ वक्तव्य भोवलं; अखेर कालीचरण महाराजला अटक

Aprna