HW News Marathi
देश / विदेश

महागाई विरोधात राष्ट्रवादीच्या महिलांचं डिजिटल आंदोलन, #मोदी_मतलब_महंगाई  हॅशटॅग होणार ट्रेंड 

मुंबई | भरमसाठ महागाईचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज (१८ मे) राज्यभर डिजिटल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. #मोदी_मतलब_महंगाई या हॅशटॅगसह ट्विटर, फेसबुक व इन्स्टाग्रामवर महिला व्यक्त होणार आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि आपला महाराष्ट्र या कृषीसंस्कृतीचा पाया आहे.केंद्रातील मोदी सरकारने परवा खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून या पायावरच घाव घातला आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेत आलं मात्र त्यानंतर उत्पन्नाच्या ऐवजी शेतीचा खर्च दुप्पट केला.

आधीच इंधन, गॅस, धान्य, खाद्यतेल यांच्या महागाईने जनता त्रस्त असताना खतांच्या किमतीत वाढ करून ग्रामीण अर्थव्यवस्था उध्वस्त करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे असा आरोपही रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

 

हा अनर्थ जर टाळायचा असेल तर आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. या भरमसाठ महागाईचा प्राणपणाने विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला फलटण आता मैदानात उतरली आहे. याच लढ्याचा एक भाग म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला रोष राष्ट्रवादीच्या महिला व्यक्त करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विनायक मेटे फडणवीसांच्या इशाऱ्यावर जनतेची दिशाभूल करतायत !  

News Desk

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान झिया यांना भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा

Gauri Tilekar

जेव्हा सर्वोच्च न्यायालय पगार वाढीवर बोलते…

News Desk