HW News Marathi
महाराष्ट्र

अर्थसंकल्प विधीमंडळात सादर होण्यापूर्वीच फुटला !

मुंबई | राज्याचा अतरिम अर्थसंकल्प विधीमंडळात सादर होण्यापूर्वीच फुटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पासंदर्भातील ट्वीटवरून फुटल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अर्थसंकल्प सभागृहात मांडण्याआधीच फुटला, मुनगंटीवर सभागृहात अर्थसंकल्प मांडत असतानाच ट्विटर अर्थसंकल्पाच्या पोस्ट पडत होत्या.

मुनगंटीवार सभागृहात अर्थसंकल्प मांडत असताना, त्यापूर्वीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटर अर्थसंकल्पाचे मुद्दे तयार करून ग्राफीक्सच्या माध्यमातून प्रसिद्‌ध झाल्याने विधान परिषदेत गोंधळ उडाला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अर्थमंत्र्यांच्या ट्विटरवरून अर्थ संकल्प फुटला असल्याचा आरोपसुद्धा विरोधकांनी केला.

यानंतर अजित पवारांनी मुनगंटीवारांनी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच तो सोशल मीडियावर प्रसिद्ध होता. हा सभागृहाचा अवमान आहे. आमच्या काळात कधीही असे झाले नव्हते. असे ट्वीट पवारांनी करून सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले. पुढे असे लिहले की, दोघांनी सभागृहाची माफी मागितली पाहिजे.

 

धनंजय मुंडेंनी ट्वीट करत विरोध केला

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच अर्थमंत्री यांच्या ट्विटर अकाउंट वरून फुटलाय. जबाबदारीच्या पदावर असताना त्यांच्याकडून ही चूक घडणे दुर्दैवी बाब आहे. सभागृहाचा हा अपमान आहे. सरकारने सभागृहाची माफी मागावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनगर समाजाला आरक्षण द्यावस वाटलं नाही का?, सदाभाऊ खोतांचा राज्यसरकारला संतप्त सवाल!

News Desk

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर

News Desk

मराठा आरक्षण : श्रेय घेण्यासाठी शिवसेनेने काहीच केले नाही !

News Desk