HW News Marathi
महाराष्ट्र

जगातील सर्वात उंच ‘भगवा ध्वज’ उभारणार रोहित पवार!

अहमदनगर | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जगातील सर्वात उंच ‘भगवा ध्वज’ उभारण्याचा निर्णय घेतला सून त्याच्या तयारीला ते लागले आहेत. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात देशातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. या स्वराज्य ध्वजाची दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 15 ऑक्टोबरला प्रतिष्ठापना करणार आहे. तर आज कर्जतचे ग्रामदैवत गोधड महाराजांच्या मंदिरापासून देशातील विविध भागात ‘स्वराज्य ध्वज पूजन’ यात्रा निघाली आहे.

७४ मीटर उंचीचा भगवा ध्वज

निजामाविरुद्ध हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावन भूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्टण म्हणजेच खर्ड्याच्या भुईकोट किल्ला… याच किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून रोहित पवार यांनी परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून त्यावर प्रेरणा, ऊर्जा देणारा ७४ मीटर उंचीचा भव्य-दिव्य असा भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे.

भगवा ध्वज हा आपल्या सर्वांचाच अभिमान

रोहित पवार यावेळी त्यांनी भगवा झेंडाच का याचं स्पष्टीकरण दिलं आहे. “भगवा ध्वज हा आपल्या सर्वांचाच अभिमान, सर्वस्व आणि स्फूर्तिस्थान आहे. भगवा रंग हा कोणा एकाचा नव्हे तर तो सर्वांचा असून समानतेचा, एकीचा संदेश देणारा आहे. पाली वाङ्मयात अनेक ठिकाणी सर्वगुणसंपन्न गौतम बुध्दांना उद्देशून ‘भगवा’ शब्द आला आहे. सहिष्णुतेची शिकवण देणाऱ्या वारकरी संप्रदायाने खांद्यावर जी पताका घेतली तीही भगव्याचीच छटा असलेल्या काव रंगातली.”

जगातील सर्वांत उंच भगवा

“शीख धर्मामध्ये त्यागाचे आणि चैतन्याचे प्रतिक आहे भगवा रंग, पगडीचा सर्वसामान्य रंगही भगवाच, पिवळ्या रंगाची सावली जिला बसंती म्हणतात ती भगव्याचीच छटा आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ मध्ये झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६X६४ फूट असून वजन ९० किलो आहे. हा राज्यातीलच नाही तर जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज असणार आहे”, अस रोहित पवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

दसऱ्याच्या मुहूर्तावर ध्वजाची प्रतिष्ठापना

दसऱ्याच्या मुहूर्तावर या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रासह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड), आग्रा किल्ला(उत्तर प्रदेश), अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा 74 ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. त्यासाठी 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर असा सलग 37 दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. निरंतर बदलते जग आणि तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव या सर्वांमध्ये आपल्या परंपरा जपून त्यांना पुढे नेण्याची गरज आहे.

या कार्यक्रमाचा प्रारंभ 9 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता कर्जत येथील संतश्री गोदड महाराज यांच्या मंदिरातील पूजेने होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर नेऊन तिथंही पूजा केली जाईल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूरात भाजपला धक्क्यावर धक्के, ‘या’ मोठ्या नेत्याला झाला कोरोना

News Desk

भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला,महाराष्ट्रातील ‘या’गोष्टी घातल्या राज्यपालांच्या कानावर…

News Desk

आघाडी सरकारला ५ लाख रुपयांची मदत करायला काय हरकत आहे – विखे पाटील

News Desk