HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीला मोठा धक्का, सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अहिर आज (२५ जुलै) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधणार आहेत. अहिर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने राष्ट्रवादीला मुंबईत मोठ खिंडार पडले आहे. मातोश्रीमध्ये आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितीत सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

उद्धव ठाकरे आज मातोश्रीमध्ये पत्रकार परिषद बोलविली आहे. अहिर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. अहिर यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला मुंबईत मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत. तसेच आघाडी शासनाच्या काळात त्यांच्यावर गृहनिर्माण राज्यमंत्री पदाची जबाबदारी देखल सांभाळली होती.

आदित्य ठाकरे येत्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे शिवसेना प्रवेशामुळे वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सोपा होईल असे बोले जाते. अहिर यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगले काम केले आहे. परंतु शिवसेनेच्या सुनिल शिंदेंनी सचिन अहिर यांचा पराभव करत याठिकाणी विजय मिळवला. सेनेनेला वरळी हातातून जावू नये म्हणून अहिर यांना पक्षात घेतेल्याचे म्हटले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शशिकांत शिंदे आणि मी एकच आहे…”, शिवेंद्रराजे यांचे मोठे विधान

News Desk

अजित पवार,धनंजय मुंडे,जयंत पाटलांसह बड्या नेत्यांना पोलिसांनी का पाठवली नोटीस?

News Desk

राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू!

News Desk