HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive | अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा !

गौरी टिळेकर | “दिल्लीतील हिंसाचार पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केली आहे. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “दिल्लीत हिंसाचार हा केंद्रीय गुप्तचार यंत्रणेचे अपयश असल्याचा आरोपही त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी केला. सुप्रिया सुळे या आज (२६ फेब्रुवारी) विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी एच. डब्ल्यू. मराठीशी खास बातचीत केली.

“आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील दिशा कायदा करण्यात येणार आहे. यावर सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की, आंध्र प्रदेशाप्रमाणे राज्य सरकार दिशा कायदा लागू करण्याचा निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधातील आंदोलनात झालेला हिंसाचारावर प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्तचर यंत्रा फेल झाली आहे. यामुळे शहांनी त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केली आहे.

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (२६ फेब्रुवारी) पत्रकार परिषद बोलविण्यात आली होती. यात सोनिया गांधींनी अमित शहांना त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनाम्याची मागणीचे मी स्वागत करत. मी स्वत: काल पुण्यात शहांच्या राजीनाम्याची मागणी असल्याचे सुप्रिया सुळेंनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितली.

राज्यात अर्थसंककल्पीय अधिवशेनाच्या सुरुवातीच्या दोन दिवसात भाजपने महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी महिलांच्या प्रश्नांना विसर पडला का ?, असा प्रश्न केल्यावर सुप्रिया सुळेंनी म्हटले की, “भाजपची सर्वबाबतीत भूमिका ही दुहेरी असते, त्यामुळे माझ्यासाठी काही हे नवीन नाही,” असेही एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

Exclusive Supriya Sule On Amit Shah | दिल्लीतील हिंसाचाराला अमित शाह जबाबदार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तरुणाची हत्या करणारे ते अखेर पोलिस निलंबित

News Desk

अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सरकारच्या तिजोरीतून ६ कोटींची उधळपट्टी!

News Desk

राज्यात २९१६ कोरोनाबाधित तर, २९५ रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

News Desk