HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात पुन्हा कडक निर्बंध; विवाह सोहळा ५०, तर अंत्यसंस्काराला २० लोकांना परवानगी

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काल (३० डिसेंबर) रात्री कोरोनाबाधिकांची संख्या ३ हजार ६७१ नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लावण्यात येतील असे संकेत टोपेंनी दिले. यानंतर काल मध्यरात्री नवीन नियमावली जारी करण्यात आले आहे. यानुसार, सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबईसह अनेक ठिकाणी आणि चौपाटय़ा, पर्यटन क्षेत्रे येथे गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास स्थानिक प्रशासनाने चौपाटय़ा, समुद्रकिनारे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

दरम्यान, विवाह सोहळा किंवा अन्य कार्यक्रमात फक्त ५० जणांची उपस्थितीची परवानगी दिली आहे.  तसेच सर्वच राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात फक्त ५० लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी असेल. हे नियम खुल्या किंवा बंदिस्त सभागृहांमधील कार्यक्रमांना लागू असणार आहेत. तर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येच्या वाढीवर किंवा महापालिका हद्दीत निर्बंध ठरविण्याचे अधिकार हे स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे. अंत्यसंस्कार विधीसाठी स्मशानभूमीत फक्त २० लोकांना परवानगी देण्यात आली. तर रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के क्षमतेला परवानगी दिली आहे.

देशात ओमायक्रॉनचा पहिला बळी महाराष्ट्रात

देशातील ओमायक्रॉनचा पहिला बळी महाराष्ट्रात झाला आहे. ज्या व्यक्तीचा ओमायक्रॉनने पहिला बळी घेलो. त्या व्यक्तीचे वय ५२ वर्षीय असून पिंपरी-चिंचवडमध्ये २८ डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला. हा व्यक्ती  नायजेरियातून प्रवास करून पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. यानंतर त्यांची तब्यात घराब झाल्यानंतर त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. या व्यक्तीला १३ वर्षापासून मधुमेहाचा त्रास होत होता. तर या व्यक्तीला पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तो उपचार घेत होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंबेडकर आणि फुले जयंती एक दिवा ज्ञानाचा लावून, घरी राहून साजरा दिवस करूया !

News Desk

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी घेतली बाळासाहेब थोरात भेट, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच नाराजी दूर ?

News Desk

अखेर वंचित बहुजन आघाडीला मिळाले नवे चिन्ह

News Desk