HW News Marathi
महाराष्ट्र

खळबळ उडवणाऱ्या मुलाखतीचं काय झालं? हवा आली आणि गेली,निलेश राणेंचा टोला …

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथाॅन मुलाखत घेतली.या मुलाखतीचे २ भाग प्रदर्शित झाले असून यामध्ये शरद पवार भाजप नेत्यांवर टिका करताना पाहायला मिळाले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आणि महाविकासआघाडीचं शरद पवारांनी तोंडभरून कौतुक केलं.

संजय राऊत आणि शरद पवारांच्या या मुलाखतीकडे राजकीय वर्तुळासोबतचं जनसामान्यांचंही लक्ष लागलेलं होतं. ही मुलाखत प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचे टीझर संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केले होते यावेळी ‘एक शरद ,सगळे गारद’ अशा मथळ्याखाली या मुलाखतीचं वर्णन त्यांनी केलं होतं.मात्र आता ही मुलाखत प्रदर्शित झाल्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी यावर सडकून टिका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘ एका मुलाखतीनंतर खळबळ उडणार होती झाली का मुलाखत ती???? कुठे काही उडलेल दिसलं नाही. हवा आली गेली तुझं माझं काय घेऊन गेली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईमध्ये पूल कोसळण्याची दुर्घटना,१३ जण जखमी असल्याची माहिती !

News Desk

विधानसभा निवडणुकीत विरोधकांचे आमदार निवडून येतील का ?

News Desk

शरद पवारांनी फोनवरून नारायण राणेंना दिल्या शुभेच्छा!

News Desk