HW News Marathi
महाराष्ट्र

‘परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे’, निलेश राणेंचा प्रहार  

मुंबई | राज्यात पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने हे प्रकरण उचलून धरले असून आक्रमक भूमिका घेतली आहे. आज (२५ फेब्रुवारी) भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजाच्या पुण्याती घरी जाऊन पाहणी केली. तसेच, पुणे पोलिस आयुक्तांचीही त्यांनी भेट घेतली. मात्र, पोलिस नीट काम करत नाही आहेत, त्यांच्याकडून तपास काढून घ्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनीही भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची हिंमत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कधीही आपल्या भाषणात ‘मी मर्द आहे‘ असा उल्लेख करु नये, अशी जळजळीत टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवत आहे.पूजा चव्हाण प्रकरणात सर्व बाजूंनी अडकलेले संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतात. कॅबिनेट मिटिंगला येऊन बसतात. तरीही त्यांचा राजीनामा घेण्याचं धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही. परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे‘, असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावी – राजू शेट्टी

News Desk

माझं मत – आपल्या शहरातील एटीएममध्ये पैसे आहेत का ?

News Desk

पुन्हा होणार राजकीय भूकंप? देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांची भेट?

News Desk