HW News Marathi
क्राइम

“हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”- नितेश राणे

मुंबई | परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. परब यांच्या ईडीच्या नोटीशीवर प्रतिक्रिया उमटत असून भाजप नेते नितेश राणे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हिंमत असेल तर ईडीच्या कार्यालयात जा. आपली बाजू मांडा. स्वच्छ असेल तर ईडी कारवाई करणार नाही. घाबरण्याचं कारण नाही, असं आव्हानच नितेश राणे यांनी दिलं आहे. नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना हे आव्हान दिलं आहे. अनिल परब यांच्या पापाचा घडा भरलाच होता. त्यांचा परिवहन खात्यातील भ्रष्टाचार उघड होता. त्यामुळे ईडीकडून त्यांना काही प्रेमपत्रं येणार नव्हतं ना… नोटीसच मिळणार होती… आता पळपुटेपणा करू नये. ईडीच्यासमोर जाऊन स्वत:ला निर्दोष असल्याचं सिद्ध करावं, असं राणे यांनी म्हटलं आहे.

परब काही एकट्यासाठी पैसे जमा करायचे नाहीत

नोटीस कशाबद्दल आहे हे मला माहीत नाही. कदाचित आरटीओमधील भ्रष्टाचार किंवा सचिन वाझेने ज्या पद्धतीने 100 कोटींच्या वसुलीत नावं घेतली आहेत. त्याची ईडीने चौकशी केली असेल आणि त्याबाबत त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी नोटीस दिली असावी, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.परब यांना ईडीची नोटीस आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. त्यावरही नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊतांना काय वाटायचं ते वाटू दे. शेवटी त्यांना काही तरी वाटावंच लागेल ना. परब काही एकट्यासाठी पैसे जमा करायचे नाहीत. ते मातोश्रीचे परिवार मंत्री आहेत. थोडं परिवाराला द्यायचं आणि थोडं स्वत:ला ठेवयाचं हेच त्यांनी केलं. त्यामुळे राऊतांना काय बोलायचं ते बोलू द्या, असं ते म्हणाले. परबांनी काय केलं नसेल तर राऊतांना तमाशा करायची गरज नाही. त्यांना जाऊ द्या ना ईडीकडे. निर्दोष असतील तर काय घाबरायचं?, असा सवालही त्यांनी केला.

चोर के दाढी में तिनका आहे

या प्रकरणात जर शिवसेनेला काही क्रोनॉलॉजी समजली आहे. तर ती हायकोर्टाला समजून सांगा. कोर्ट ईडीवर ताशेरे ओढेल. क्रोनॉलॉजी समजली आहे तर कोर्टात जाता येतं ना. तुम्हाला कोणी थांबवलं आहे, असं सांगतानाच नारायण राणेच्या प्रकरणात संबंध जोडायचा तर नाशिकचे पोलीस कमिशनर दीपक पांड्ये यांचा जोडला पाहिजे. गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे-पाटलांचा जोडला पाहिजे. चोर के दाढी में तिनका आहे. या संपूर्ण प्रकरणात वळसे-पाटील नामधारी गृहमंत्री होते. कार्यकारी गृहमंत्री कोण होतं हे त्या क्लिपमध्ये सर्वांनी पाहिलं, असंही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वसई, विरारमध्ये सीरिअल रेपिस्टची दहशत

swarit

आठ वर्षाच्या मुलाला सोडून आई पळाली

News Desk

दहशतवादी सलिम खानला मुंबईतून अटक

News Desk