HW News Marathi
महाराष्ट्र

उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री महाराजांचा जयजयकार करतात तर महाराष्ट्राचे सत्ताधारी… नितेश राणेंचा पुन्हा हल्लाबोल

मुंबई | उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे नामकरण करून ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ ठेवल्यानंतर राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. कायमच आघाडी सरकारवर टीका करणारे भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा टिका केली आहे. ‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराजांचा जयजयकार करतात तर महाराष्ट्राचे सत्ताधारी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागतात’ अशी टीका त्यांनी केली आहे. म्हटलं आहे. तर काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांना महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे अशी टिका केली होती.

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे केले आहे. जेव्हा पासून योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यापासून ते वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणांचे नावं बदलत आहे. मुघलांची ओळख आम्हाला नकोय आणि आम्हाला आमच्या संस्कृतीवर गौरव आहे, असं योगींनी म्हटलं आहे. दरम्यान, उदयनराजेंनी योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे, झेपेल तर पुढे जा!

News Desk

पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश, आपत्कालीन मदत यंत्रणेचे मानले आभार

News Desk

बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी क्रांती मोर्चा

News Desk