HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेला मोठा धक्का, नितीन नांदगावर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

मुंबई | विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस समर्थक नितीन नांदगावकर यांनी काल (२ ऑक्टोबर) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेस्टाइल खळ्ळ फटॅक आंदोलनांमुळे नितीन नांदगावकर हे चर्चेत आले होते.

पहिल्या टप्प्यात मनसेकडून २७ उमेदवारांची नावे घोषित केली होती. आज मनसेने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिली आणि दुसरी यादी मिळून मनसेने आतापर्यंत ७२ जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तसेच नांदगावकर हे त्यांच्या आक्रमक शैलीमध्ये अनेकांना न्याय मिळवून दिला होता. हल्लीच त्यांनी टॅक्सी मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या टॅक्सी चालकांविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

नांदगावकर यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. परंतु, मनसेकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज नांदगावकर यांनी काल रात्री मातोश्री निवासस्थानी शिवसेना ठाकरे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीन नांदगावकर यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मनसेची दुसरी यादी

  • मंदार हळवे – डोंबिवली
  • प्राची कुलकर्णी – धुळे
  • जमील देशपांडे – जळगाव (शहर)
  • मुकुंद रोटे – जळगाव (ग्रामीण)
  • अकलेश पाटील – अमळनेर
  • विजयानंद कुलकर्णी – जामनेर
  • रविंद्र फाटे – अकोट
  • विजयकुमार उल्लामाळे – रिसोड
  • सुभाष राठोड – कारंजा
  • अभय गेडाम – पुसद
  • गंगाधर फुगारे – नांदेड (उत्तर)
  • सचिन पाटील – परभणी
  • विठ्ठल जवादे – गंगाखेड
  • प्रकाश सोळंखी – परतूर
  • संतोष जाधव – वैजापूर
  • नागेश मुकादम – भिवंडी पश्चिम
  • मनोज गुडवी – भिवंडी (पूर्व)
  • महेश कदम – कोपरी-पाचपखाडे
  • निलेश बाणखेले – ऐरोली
  • किशोर राणे – अंधेरी (पश्चिम)
  • सुनिल भारसकर – चांदीवली
  • सतिश पवार – घाटकोपर (पूर्व)
  • विजय रावराणे – अणुशक्तीनगर
  • केशव मुळे – मुंबादेवी
  • संजय गायकवाड – श्रीवर्धन
  • देवेंद्र गायकवाड – महाड
  • प्रकाश रेडकर – सावंतवाडी
  • भाऊसाहेब पगारे – श्रीरामपूर
  • वैभव काकडे – बीड
  • शिवकुमार नगराळे – औसा
  • हनुमंत भोसले – मोहाळ
  • मधुकर जाधव – अक्कलकोट
  • मनिषा करचे – माळशिरस
  • गणेश कदम – गुहागर
  • मनोज बाव्वनगडे – उमरेड
  • महालिंग कंठाडे – राजूरा
  • युवराज येडूरे – राधानगरी
  • सुमेत भंवर – अंबरनाथ
  • सुनील निभाड – डहाणू
  • दिनकर वाढान – बोईसर
  • संतोष नलावडे – शिवडी
  • जुईली शेंडे – विलेपार्ले
  • विनोद राठोड – किनवट
  • डॉ. अमर देशमुख – फुलंब्री
  • रामराव वानखेडे – उमरखेड
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे”, मुनगंटीवारांचे मोठे विधान

News Desk

आमच्या नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केलं जातय – सुप्रिया सुळे

News Desk

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापुजा

Aprna