HW News Marathi
महाराष्ट्र

‘नितीश कुमार सरकारसोबत आहेत पण त्यांचं मन आमच्यासोबत’, संजय राऊतांची प्रतिक्रिया!

नवी दिल्ली। संसदेत विविध मुद्द्यांवर चर्चा न होण्याला कारणीभूत ठरलेल्या पेगॅसस पाळत प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यास बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अनुकूलता दर्शवली होती. पेगॅसस पाळत प्रकरणाच्या या वादाबाबत मी वर्तमानपत्रांमध्ये जे काही वाचले आहे, तेवढीच मला या विषयाबाबत माहिती आहे, असेही नितीशकुमार यांनी स्पष्ट केले होते. ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाईट कामांसाठी होऊ शकतो, हे सर्वाना माहीत आहे. लोकांच्या मोबाईवरील संभाषण टॅप करण्याचे प्रयत्न झाले असतील, तर या प्रकरणाचा तपास करणे योग्य ठरेल,’’ असे आपल्या आठवडी जनता दरबारानिमित्त ते माध्यमांशी बोलत त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पण त्यांचं मन आमच्यासोबत

“मी नितीश कुमार यांचा आभारी आहे. ते नेहमीच एक आदर्श नेते राहिले आहेत. आज ते सरकारसोबत आहेत पण त्यांचं मन आमच्यासोबत आहे, मला माहित आहे. जर ते म्हणत असतील की ‘पेगॅसस’ प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, तर विरोधी पक्ष ही तेच म्हणत आहेत जे त्यांनी सांगितलं आहे. मोदीजींनी आता तरी ऐकावं,” असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कोणाकडे ठोस माहिती असेल तर ती सरकारला द्यावी

या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी या विरोधी पक्षांच्या मागणीबाबत विचारले असता, ‘‘संसदेच्या सभागृहांमध्ये काय चालले आहे त्यावर मी भाष्य करू शकत नाही,’’ असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले होते. पेगॅसस पाळतप्रकरणी कोणाकडे ठोस माहिती असेल तर ती सरकारला द्यावी. सरकार त्याबद्दल प्रामाणिकपणे चौकशी करेल, अशी मला खात्री वाटते, असेही नितीशकुमार यांनी सांगितले होते.

राहुल गांधी लवकरच महाराष्ट्रात येणार

राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यशैलीविषयी जाणून घेण्याची इच्छा असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊतांनी सांगितलंय. काल संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात नवी दिल्लीत जवळपास सव्वा तास खलबतं झाली.. राहुल गांधी लवकरच महाराष्ट्रात येणार असल्याचंही राऊतांनी सांगितलंय.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एक देश एक निवडणूक भारतात अशक्य | राऊत

News Desk

‘माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो’- बच्चू कडू

News Desk

महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही, राजेश टोपेंची माहिती

News Desk