HW News Marathi
महाराष्ट्र

नॉट रिचेबल ! धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी दाखल

मुंबई | राज्यातील राजकारणाला अनपेक्षित असे वळण घेतले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज (२३ नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक आणि राजकीय भूकंप झाला होता. पवारांच्या सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे काही आमदार उपस्थित राहिलेले ११ पैकी ७ आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतले. मात्र, अजित पवारांच्या बंडाला धनंजय मुंडेंसोबत दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

त्याचबरोबर धनंजय मुंडे हे कालपासून (२३ नोव्हेंबर) यांचा फोन नॉट रिचेबल येत होता. मात्र, आज वाय. बी सेंटरमध्ये राष्ट्रवादीने त्यांच्या आमदारांची बैठक बोलविण्यात आली. या बैठकीसाठी धनंजय मुंडे दाखल झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंडेसोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या बैठकीसाठीधनंजय मुंडे हे काही आमदार घेऊन गुजरातला गेले असल्याची अफवा पसरली होती. मात्र मी इथचे आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पुन्हा सेंटरमध्ये नाट्यमय प्रवेस केला. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांशी संवाद साधला. यातील आतापर्यंत ७ आमदार पक्षात पुन्हा परतले आहेत. यामध्ये दिलीप बनकर, नानासाहेब झिरवळ, माणिकराव कोकाटे, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा, डॉ. राजेंद्र शिंगणे आणि सुनील शेळके असे आमदार राष्ट्रवादीसोबत कायम राहिलेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छटपूजेसाठी राज्य सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना!

News Desk

महाड न्यायदंडाधिकाऱ्यांकडून 4 अटींसह नारायण राणेंना जामीन मंजूर!

News Desk

गरिबांना लुटायचं आणि उद्योगती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रम !

swarit