HW News Marathi
महाराष्ट्र

आता बिचूकलेंना चक्क विधान परिषदेवर जाण्याची इच्छा, राज्यपालांना पाठवले पत्र

मुंबई | बिग बॉस फेम आणि साताऱ्यात उदयनराजेंनाही आव्हान देणारे कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले यांना आता चक्क विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून जाण्याची इच्छा आहे. याचसाठी आता अभिजित बिचुकले यांनी थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांचा कार्यकाळ आता संपत आहे. याच पार्श्वभूमीवर, अभिजित बिचुकले यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कला क्षेत्रातून आपली राज्याच्या विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणीच अभिजित बिचुकले यांनी केली आहे. पण प्रत्यक्ष राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी प्रथम मुख्यमंत्र्यांना अर्ज करावा लागतो. त्यानंतर मुख्यमंत्री ती शिफारस राज्यपालांकडे करत असतात. मात्र, इथे अभिजित बिचुकले यांनी तर चक्क शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करत थेट राज्यपालांकडे पत्राद्वारे याबाबतची मागणी केली आहे.

https://www.facebook.com/hwnewsmarathi/videos/1645335422308188/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

News Desk

प्रदेश काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलच्या प्रदेशाध्यपदी उमाकांत अग्निहोत्री यांची नियुक्ती

Aprna

अहमदनगर शहरातील राजकीय गुंडगिरी रोखणार कोण ?

News Desk