HW News Marathi
महाराष्ट्र

आता धारावीतील प्रत्येक नागरिकाची होणार कोरोना टेस्ट

मुंबई | धारावीतील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत, जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी हा निर्णय घेतला. खासदार शेवाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धारावीतील 150 खासगी डॉक्टरांनी पालिकेच्या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दाखविला आहे. त्यामुळे येत्या 10-12 दिवसांत संपूर्ण धारावी परिसरातील नागरिकांची कोरोना चाचणी करणे पालिकेला शक्य होणार आहे. याचबरोबर, धारावी पोलीस स्थानक आणि रुग्णालयांच्या ठिकाणी सॅनिटायझर टनेलही लवकरच उभारण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

धारावीवरील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांनी पालिकेच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार राहुल शेवाळे यांनी केले होते. या आवाहनाला, इंडियन मेडिकल कौन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने, धारावीतील 150 खासगी डॉक्टर्स पालिकेच्या मोहिमेत सहभागी होणार आहेत. या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना राहुल शेवाळे म्हणले की, “2 खासगी डॉक्टर्स आणि 3 पालिका वैद्यकीय कर्मचारी असे 5 जणांचे पथक सुमारे 5000 नागरिकांची चाचणी करणार आहे. अशा पथकांच्या माध्यमातून 10- 12 दिवसांत धारावीतील सुमारे साडे सात लाख नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही, मोठ्या पक्षासोबत युती करणे योग्य – रामदास आठवले  

News Desk

हिंदू सणांच्या वेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?; आशिष शेलारांचा सवाल

News Desk

#LetterToAmbedkar : मोहिमेनुसार मंत्री जयंत पाटील यांचे बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन !

News Desk