HW News Marathi
महाराष्ट्र

“भोंगेधारी आणि पुंगीधारी फार पाहिले”, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई | “सध्या मार्केटिंगचा जमाना आहे. आवडले तर परत करा, तसेच हे फळले तर ठीक नाही तर परत. गाजराची पुंगी वाजली तर वाजलीच, असे भोंगेधारी आणि पुंगीधारी फार पाहिले आहेत,” अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये सभा होणार असून औरंगाबादमधील महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार आहे. औरंगाबाद सभेसाठी राज ठाकरे हे काल (१ मे) पुण्याहून निघण्याआधी निघाले होते. याआधी गुडीपाढवा आणि ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरेंनी राज्यभरातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले, “मी अशा खेळाडूंकडे फार लक्ष देत नाही. कारण हे खेळाडू कोणत्या मैदानात खेळता. हे लोकांनी आतापर्यंत अनुभवले आहेत. कधी मराठी आणि हिंदुत्वाचा खेळ सुरू आहे. हे सर्व महाराष्ट्राची जनता पाहते,” असे त्यांनी लोकसत्तेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “शिवसेनेची हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख करून देण्याची गरज नाही. आणि ते लपवण्याची गरज देखील नाही. आता काही जण हे करून बघू कधी ते करून बघू बोलत आहेत. सध्या मार्केटिंगचा जमाना आहे. आवडले तर परत करा, तसेच हे फळले तर ठीक नाही तर परत. गाजराची पुंगी वाजली तर वाजलीच, असे भोंगेधारी आणि पुंगीधारी फार पाहिले आहेत. यामुळे हिंदूना सर्व काही समजले, कधी तरी मराठी म्हणायाचे आणि फसल्यावर पतर आम्ही हिंदू म्हणून पुन्हा बोलायचे, याला आम्ही माकडचाळे म्हणतात, ” अशी टीका राज ठाकरेंवर केली आहे.

राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांकडून १६ अटी

राज्यात कोणताही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या सभेसाठी पोलिसांनी १६ अटी घातल्या आहेत. पोलिसांनी घातलेल्या सर्व अटींचे पालन करणार असून पोलिसांना सहकार्य करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गुरुवारी (२८ एप्रिल) माध्यमाशी बोलताना दिली आहे राज ठाकरेंची सभा ही सायंकाळी ५ वाजेपासून ते ९.३० दरम्यान आयोजित करण्यात यावी. राज ठाकरे हे ७.३० वाजता बोलणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासभेत १५ हजारपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करण्यात येऊ नये. आणि सभेत सहभागी होणाऱ्या हुल्लडबाजी, घोषणाबाजी आणि असभ्य वर्तन करू नये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोणताही नवा प्रस्ताव नाही, निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदावर सहमती झाली होती !

News Desk

नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने दुकाने बंद राहणार, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचा निर्णय

News Desk

उद्धव ठाकरेचं ५ वर्ष मुख्यमंत्री असतील! नाना पटोलेंचं ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

News Desk