HW News Marathi
महाराष्ट्र

जुन्या मंत्र्यांना डच्चु, नारायण राणेंना मंत्रिमंडळात स्थान

मुंबई विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसून केवळ फेरबदल केले जाणार आहे. यावेळी काही मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. तसेच नवीन चेह-यांना संधी दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील भाजप सरकारला ३१ आॅक्टोबरला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांनी एका ठिकाणी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सरकारने यशस्वीपणे राबवलेल्या योजना, २०१९ मध्ये होणाºया लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तसेच आगामी मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत सविस्तर माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. पण मंत्रिमंडळ विस्तार नसून फेरबदल होणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. फेरबदलात काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार आहे. तसेच नवीन चेहºयांना संधी दिली जाईल, असे ते म्हणाले. काँग्रेसला ‘रामराम’ केल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करून एनडीएला पाठिंबा जाहीर करणाºया नारायण राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याबाबत आम्ही निश्चितच निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अद्याप कोणत्याही मंत्र्यांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत. तसेच गेल्या तीन वर्षांत काही मंत्र्यांची कामगिरी लक्षवेधी झालेली नाही. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ फेरबदलातून कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आणि कुणाला संधी मिळेल, अशी चर्चा आता राजकीय वतुर्ळात सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील एका मंत्र्याची आज विकेट पडणार ! चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

News Desk

“पोलिस दलातील प्रत्येक शिपाई PSI होणार”, गृहमंत्र्यांनी दिली माहिती

News Desk

संजय राऊत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते ! शिवसेना प्रवक्त्यांची यादी पाहा

News Desk