HW News Marathi
महाराष्ट्र

आषाढीच्या महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

मुंबई । पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले.

समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली तसेच त्यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन सत्कार केला.

याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…अन्य मंडळांचं देखील विलीनीकरण करावं लागेल!” – शरद पवार

News Desk

केंद्राला आरक्षण द्यायचं नसेल तर घटना दुरुस्ती करुन राज्याला अधिकार द्या, राष्ट्रवादीची मागणी

News Desk

लोकशाही पूर्णपणे नष्ट केली…

swarit