HW News Marathi
देश / विदेश

मोठ्या पडद्यावर, लवकरच येणार मीराबाई चानूच्या जीवनावर सिनेमा

मुंबई। टोकयो ऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूने सर्वचं भारतीयांचं मन जिंकलं आहे. तिच्यावर सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे. आत्ता अजून एक आनंदाची माहिती समोर आली आहे. मीराबाई चानूवर लवकरच एक चित्रपट बनवला जाणार आहे. हा चित्रपट मणिपुरी भाषेत बनवण्यात येणार आहे. यासंबंधी काल मीराबाईच्या राहत्या घरी इम्फाळच्या नोगपोक काकचिंग या गावी इम्फाळच्या सेऊती फिल्म प्रोडक्शनतर्फे एक करारावर हस्ताक्षर घेण्यात आले आहेत. याबद्दलची माहिती निर्माण कंपनीचे अध्यक्ष मनाओबी एम एमकडून जाहीर करण्यात आली आहे.

जी मीराबाई चानूच्या भूमिकेला पूर्ण न्याय देऊ शकेल

तसेच त्यांनी सांगितलं आहे, की ‘मीराबाई चानूवर बनणारा हा चित्रपट इंग्लिश आणि विविध भारतीय भाषेतदेखील डबिंग केला जाणार आहे. आत्ता आम्ही अशा मुलीचा शोध सुरु केला आहे. जी मीराबाई चानूच्या भूमिकेला पूर्ण न्याय देऊ शकेल. ती दिसायला जवळजवळ मीराबाईसारखी हवी. त्यानंतर तिला तिच्या जीवनशैलीबद्दल प्रशिक्षण दिलं जाईल’.

आपल्या सर्व खाजगी अडचणी सोडून कष्ट केले

‘या चित्रपटाचं शुटींग सुरु होण्यासाठी अजून 6 महिन्यांचा कालावधी लागेल. यामार्फत दाखविण्यात येईल की, जी मीराबाई चानूच्या भूमिकेला पूर्ण न्याय देऊ शकेल एक करून, आतोनात मेहनत घेऊन आणि आपल्या सर्व खाजगी अडचणी सोडून कष्ट केले, आणि देशासाठी मेडल मिळवलं’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्नधान्य उत्पादनात दुपटीने वाढ

News Desk

#PulwamaAttack : सर्वपक्षीय बैठकीत दहशतावादाविरोधात त्रिसूत्री प्रस्ताव मंजूर

News Desk

चारा घोटाळाप्रकरणी CBI विशेष न्यायालयाकडून लालू प्रसाद यादव दोषी

Aprna