HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांचे नातजावई डाॅ.आनंद तेलतुंबडे यांचे एनआयएसमोर आत्मसमर्पण !

मुंबई | भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणा डॉ. आनंद तेलतुंबडे यांना आज (१४ एप्रिल) राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेसमोर (एनआयए) आत्मसमर्पण केल्याची माहिती त्यांचे वकिल मिहीर देसाई दिली. तेलतुंबडी यांनी मुंबईतील कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात आनंद तेलतुंबडे पोचून त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असून तेलतुंबडे हे आंबेडकरांचे नातजावई आहे. आंबेडकर जयंती दिनीच आंबेडकरांच्या नात जावयाला अटक करण्यात आल्याने आंबेडकरी जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवसस्थानी काळा झेंडा दाखविण्यात आला आहे.

तेलतुंबडे यांच्यासोबत नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी आज एनआयएसमोर आत्मसमर्पण केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने तेलतुंबडे आणि नवलखा यांनाआठवड्या भराच्या आत तुरुंग प्रशासनाला आत्मसमर्पणा करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे तेलतुंबडे आणि नवलखा आज एनआयएच्या कार्यालयात उपस्थित झाले. त्यानंतर या दोघांनाही एनआयएकडून ताब्यात घेण्यात आले. ८ एप्रिल रोजी त्यांना आत्मसमर्पणासाठी मुदत वाढवून देताना यानंतर मात्र अतिरिक्त वेळ मिळणार नाही, असं न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील खंडपाठीने स्पष्ट केले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला, विनोद पाटलांचा आरोप

News Desk

शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन !

News Desk

पुण्यात दुमजली इमारत कोसळली, बचाव कार्य सुरु

News Desk