Site icon HW News Marathi

लालबागच्या राजाच्या दरबारात भाविक आणि सुरक्षारक्षक धक्काबुक्की

मुंबई | तब्बल दोन वर्षानंतर राज्यभरात गणेशोत्सवाची उत्साहात सुरू झाला आहे. सर्वसामान्यापासून ते नेते मंडळीपर्यंत सर्वांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या मंडपात भविकांची गर्दी केली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दरबारात भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वादविवाद झाला असून यावेळी दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, राज्यासह देशभरातून अनेक भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. यावेळी भाविक लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाच्या रांगेत उभे असताना त्यांचे खटके उडले. यानंतर भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाले आणि या वादाचे रुपांतर धक्काबुक्कीमध्ये झाले.

याआधी लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी अनेकदा अरेरावी, धक्काबुक्की आणि ढकलाढकली या घटना घडल्या आहेत. कोरोनाच्या संकटानंतर राज्यात पुन्हा एकदा गणेशोत्सव धुमधडक्यात साजरा होणार आहे. यंदाच्या लालबागच्या राजाच्या दर्शनात मुंबई पोलीस, पालिका कर्मचारी आणि मंडळाच्या सदस्यांकडून गर्दीचे नियोजन केले आहे.

 

 

 

 

 

 

Exit mobile version