HW News Marathi
महाराष्ट्र

शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षकांशी संवाद साधणार; समाजमाध्यमांद्वारे होणार थेट प्रसारण

मुंबई। शिक्षक दिनाचे (Teacher’s Day) औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज ( ५ सप्टेंबर) राज्यातील शिक्षकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे वर्षा शासकीय निवासस्थानातून दुपारी १ वाजेपासून दृकश्राव्य प्रणालीद्वारे राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. कोरोना संकटानंतर अलीकडेच शैक्षणिक वर्षाला नियमितपणे सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध मुद्दे आणि नवी दिशा यांचा या संवादादरम्यान ऊहापोह होणे अपेक्षित आहे. या संवादाचे मुख्यमंत्री सचिवालयाच्या समाज माध्यमांवरून थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांत सिंह आत्महत्येच्या चौकशीसाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला मुंबई पालिकेने केले सक्तीचे क्वॉरंटाईन

News Desk

पवार-गडकरींमध्ये चर्चा तर गिरीश बापटांचं नितीन गडकरींना पत्र!

News Desk

उद्धव ठाकरेंचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द

News Desk