Site icon HW News Marathi

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

मुंबई । भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन (Republic Day) दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी व वरीष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते.

Exit mobile version