HW News Marathi
देश / विदेश

पंकजा मुंडेंना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये मिळणार संधी ! फडणवीसांची दिल्ली वारी….

दिल्ली| माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दिल्लीचा दौरा राजकीय कारणांनी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. फडणवीसांनी गृहमंत्री आणि इतर अनेक महत्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत भेटीगाठी घेतल्या. यावेळी राज्यातील कोरोनाच्या स्थितीसह राजकारणाबाबतही चर्चा झाली. राज्यातील साखर उद्योग आणि शेतकऱ्यांसंबंधितचे काही प्रश्न यावेळी केंद्रीय मंत्र्यांकडे मांडल्याचं फडणवीसांनी माध्यमांना सागितलं आणि महाविकासआघाडीचं सरकार पाडण्याचा भाजपचा कोणताही डाव नाही असे स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत निवड होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये पंकजा मुंडे ,आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर पाटील यांना स्थान मिळण्याचं निश्चित झालं आहे. तसेचं माजी मंत्री हंसराज अहिर यांनाही महत्त्वाची जबाबदारी मिळणार असून येत्या आठवडाभरात भाजप कार्यकारणी जाहीर होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत आज देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार आहे, अशीही माहिती आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम मंदिर व्हावे ही लोकांची इच्छा आहे !

News Desk

शत्रुघ्न सिन्हांचा मोदींवर पून्हा एकदा हल्लाबोल 

News Desk

एसपीजी विधेयक राज्यसभेत मंजूर, काँग्रेस नेत्यांचा सभात्याग

News Desk