HW News Marathi
Covid-19

“बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचं हित माहितीये”, आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहीत पंकजा मुंडेंचा मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र लिहिलं आहे. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या २ लाख पैकी बीडलाही पुरेशा लसी मिळाल्या पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत, असे ट्वीट पंकजा मुंडेंनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तासगावच्या द्राक्ष उत्पादकांसाठी जयंत पाटील यांचा अनोखा पॅटर्न

News Desk

राज्यात २,९४० नवे कोरोनाबाधित तर ८५७ रुग्ण ‘कोरोनामुक्त’

News Desk

कोरोनावर ४ लसींचे लवकरच क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार

News Desk