HW News Marathi
महाराष्ट्र

“तुम्ही सांगायचं आणि मी करायचं”; दसरा मेळाव्यासाठी आपल्या समर्थकांना पंकजांचं भावनिक आमंत्रण

बीड | बीडमध्ये यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी भगवान गडावर जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. खासदार प्रीतम मुंडे स्वतः याचा आढावा घेत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे या मेळाव्याला संबोधित करतील. याच पार्श्वभूमीवर, आता पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्यासाठी भगवान गडावर येण्याचं आवाहन केलं आहे. ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओद्वारे पंकजा म्हणतात, “होय, तुम्ही सांगायचं आणि मी करायचं. आपला दसरा आपली परंपरा!!”पंकजा मुंडे या ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओतून आपले कार्यकर्ते आणि समर्थकांना भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या परंपरेचं महत्त्व समजवून सांगत आहेत.

दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, स्वतः पंकजा मुंडे, भगवानगड आणि दसरा मेळावा यांच्यातलं नातं नेमकं काय आहे? हे पंकजा मुंडे यांनी आपल्या या व्हिडिओमार्फत सांगितलं आहे. अत्यंत भावनिक आव्हानमार्फत पंकजा यांनी आपल्या समर्थकांना दसरा मेळाव्याला येण्याचं आमंत्रण दिलं आहे. २ मिनिटं १३ सेकंदांच्या या व्हिडीओत आधीच्या दसरा मेळाव्यांची, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भगवान गडावरील उपस्थिती आणि पंतप्रधान मोदींचीही काही छायाचित्रं आहेत. त्याचसोबत, शेतकरी, ऊस कामगार, विकास कामांचाही ह्यात उल्लेख आहे.

पंकजा मुंडे व्हिडिओत काय म्हणाल्या?

“तुम्ही म्हणालात त्या प्रत्येक लढ्यात तुमच्यासमोर उभी राहिले. कारण, माझ्यामागे तुम्ही होतात. आपलं नातंच असं आहे, तुम्ही सांगायचं आणि मी करायचं. आताही तुम्ही म्हणालात, ताई आपली परंपरा, भगवानबाबांच्या भक्तीची आणि मुंडे साहेबांच्या शक्तीची परंपरा जपली पाहिजे. मुंडे साहेबांना दर दसऱ्याला कधी मुंबई तर कधी दिल्ली दिसायची. मला मात्र दसऱ्याला भव्य जनसागरामध्ये केवळ अन् केवळ भगवानबाबांचे आशीर्वाद आणि मुंडे साहेबांची मूर्ती दिसते. तुम्ही सांगितलं मेळावा झाला पाहिजे म्हणूनच १५ ऑक्टोबरला भगवान बाबांची भक्ती आणि मुंडे साहेबांची शक्ती या परंपरेसाठी मी येत आहे. सावरगाव भगवान भक्तीगड येथे.तुमच्या सर्वांची मी वाट पाहत आहे”, असं भावनिक आमंत्रण पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लक्षवेधी आंदोलन करण्याची मराठवाड्याची परंपरा

News Desk

लॅटव्हियामध्ये अडकलेल्या ३७ भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी उदय सामंत प्रयत्नशील

swarit

पुणे मॅरेथाॅनमध्ये झिके अटलाव डेबेबे विजयी 

News Desk