HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता परमबीर सिंह गायब, गृहमंत्री वळसे पाटील यांचे वक्तव्य!

मुंबई। होमगार्डचे महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हे कोणाचीही परवानगी न घेता मुंबईतून परदेशात पळून गेल्याचा सर्वांचा संशय आहे. एक महासंचालक दर्जाचा अधिकारी देशाबाहेर जायचे असेल तर वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र परमबीर सिंह यांनी गृहमंत्री म्हणून माझी किंवा राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची परवनागी घेतली नाही. असे धक्कादायक विधान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी केले आहे.

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी केंद्र सरकारच्या संपर्कात

आतापर्यंत परमबीर सिंह यांना ५ समन्स पाठवण्यात आले असून नॉन बेलेबल वॉरंटही त्यांच्या नावाने पाठवण्यात आले आहे. तसेच लूकआऊट नोटीस त्यांना पाठवण्यात आली असून त्यांच्या मुंबई आणि चंदीगढ येथील घर बंद असल्याचे सीआयडी पथकाच्या तपासात निष्पन्न झालं आहे.गेल्या काही दिवसात परमबीर सिंह हे नॉट रिचेबल असून ते कोणाच्याही संपर्कत नाही त्यामुळे ते मुंबई महाराष्ट्र मधून परदेशात पळून गेल्याचा संशय पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी केंद्र सरकारच्या संपर्कात असून सिंह यांनी चौकशीला सामोरे जावे असे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.

पोलिसांना १०० कोटी हप्ता वसूलीचे टार्गेट दिले होते

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांची होमगार्डच्या महासंचालक पदी बदली झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना १०० कोटी हप्ता वसूलीचे टार्गेट दिले होते असा लेटर बॉम्ब ठाकरे सरकारवर टाकला होता. त्यानंतर ६ हून अधिक प्रकरणात परमबीर ३ पोलीस उपायुक्त आणि डझनभर पोलीस अधिकारी यांच्या सिंडिकेटबद्दल राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये धमकावणे आणि खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत.१०० कोटीच्या वसुली प्रकरणात न्यायमूर्ती चांदीवाल चौकशी करत असून आतापर्यंत त्यांनी ५ समन्स पाठवले आहेत. एनआयएने नुकतचे दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंह आणि एंटीलिया येथील जिलेटीनच्या कांड्या सापडल्यामध्ये अनेक प्रश्न परमबीर सिंह यांच्या कार्यपद्धतीवर निर्माण केले आहेत.

प्रसार माध्यामांत येत असलेल्या बातमीवरुन संशय

परमबीर सिंह हे होमगार्डचे महासंचालक असून १ मे पासून ते ३१ ऑगस्टपर्यंत प्रकृतीच्या कारणास्तव दिर्घकालीन रजेवर होते. रजा संपल्यानंतर त्यांनी १ सप्टेंबरपासून कार्यालयात पुन्हा रुजू होणे अपेक्षित होते. मात्र आज १ महिन्यानंतरही परमबीर सिंह कुठे आहेत. याबाबत कोणालाच थांगपत्ता नसल्याने अखेर राज्यातील गृहविभागाने केंद्राची मदत घेण्याचे ठरवले आहे. यापूर्वी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांच्यासह २५ पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबणाचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला आहे.आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसार माध्यामांत येत असलेल्या बातमीवरुन संशय व्यक्त केल्याने परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परमबीर सिंह फरार असून ही खूप गंभीर बाब आहे. पोलीस परमबीर सिंह यांना शोधत आहेत. सिंह यांनी चौकशीला सामोरे जावे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

गृहविभागातील वरिष्ठ पोलीसअदिकाऱ्यांच्या मते परमबीर सिंह हे त्यांना पहिले समन्स देण्याअगोदरच देशाबाहेर पळाले आहेत. ते चंदीदढमधून नेपाळ आणि नेपाळमार्गे लंडनला पळून गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना पळून जाण्यासाठी सरकारने एक प्रकारे मदत केली काय असे आता बोलले जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्य आज ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करणार?

Aprna

पुणे शिक्षक मतदारसंघात अखेर काँग्रेसचे जयंत आसगावकर विजयी

News Desk

जिल्हा व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित घ्याव्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना

Aprna