HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांना क्लीनचीट देणारे परमबीर सिंह यांनी स्वीकारला मुंबई पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार..

मुंबई मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे आज सेवानिवृत्त झाले. बर्वे यांच्या जागी आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे,सिंह यांनी आजचं आपला पदभार स्विकारला. परम बीर सिंह हे 1988 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत.

परमबीर सिंह यांची कारकिर्द

गेल्या अनेक दिवसांपासुन मुंबई पोलिस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू होती. मुंबईचे नविन पोलिस आयुक्त झालेले परम बीर सिंह हे ठाणे पोलिस आयुक्तपदी सुद्धा होते. तिथून लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रामध्ये सत्तेची गणिते बांधली जात असतानाच परम बीर सिंह यांनी नागपूर उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सिंचन गैरव्यवहारात अजित पवार यांना ‘क्लिन चिट’ दिली होती. मंत्री नव्हे तर अधिकारी गैरव्यवहाराला जबाबदार असल्याचे परमबीर सिंह यांनी म्हटले होते. यापार्श्वभुमीवर परमबीर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. परमबीर सिंह यांची मुंबई पोलिसआयुक्तपदी निवड होण्यामागे, गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असणे हेही महत्वाचे मानले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरक्षणासाठी धनगर समाजही रस्त्यावर उतरणार 

swarit

‘आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला,भाजपाला विस्ताराची संधी’, देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

News Desk

नोकरशहा महाविकसआघाडीत भांडणे लावत आहेत | अशोक चव्हाण

News Desk