HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांच्या बारामतीत होणाऱ्या ‘एल्गार महामोर्चाला’, पोलिसांनी नाकारली परवानगी…!

बारामती। येणाऱ्या 29 जुलैला पवारांच्या बारामतीत ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी एल्गार महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. संपूर्ण राज्यातील वातावरण या मोर्चाने ढवळून निघाले असताना आता मात्र बारामती पोलिसांनी कोरोनाचे कारण सांगत या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हा महामोर्चा होणार का याकडे ओबीसी बांधवांचे लक्ष लागले आहे.

बारामती पोलिसांनी नाकारली परवानगी

ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी 29 जुलै रोजी बारामती येथे सर्वच ओबीसी बांधवांनी एकत्र येत एल्गार महामोर्चाचे आयोजन केले आहे. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी चालू आहे. या मोर्चाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री छगन भुजबळ, मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे पालवे, माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षातील दिगग्ज मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. बारामतीतील ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने या सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांच्या भेटी घेत यांना मोर्चाला उपस्थित राहण्याबाबत आमंत्रणही दिले होते.

लोकांना एकत्र येण्यास मज्जाव आहे

त्यांनीही सदर मोर्चाला उपस्थित राहण्याबद्दल अनुकुलता दर्शवली होती. बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात शिष्टमंडळाने गावोगावी भेट देत चोख नियोजन केले आहे. मात्र मोर्चा आठ दिवसांवर आला असताना बारामती पोलिसांनी एक नोटीस काढत सदर मोर्चाला परवानगी नाकारली आहे. बारामतीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मोर्चाच्या आयोजनामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची असून पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव आहे .

परवानगी नाकारली असताना मोर्चाला मंत्री उपस्थित राहणार का?

मोर्चाच्या आयोजनामुळे कोरोना रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामती पोलिसांनी मोर्चेक-यांना मोर्चा काढण्यात ऐवजी आपले म्हणणे कायदेशीर मार्गाने मांडण्याचा सल्ला देत या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तशा प्रकारची नोटीस बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी जारी केली आहे. त्यामुळे या हा एल्गार महामोर्चा होणार का? पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली असताना या मोर्चाला मंत्री उपस्थित राहणार का? ओबीसी बांधव या नोटीस विरोधात काय भूमिका घेणार याकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात

swarit

अखेर जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मुहूर्त ठरला

Gauri Tilekar

गिरीश महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवा! – एकनाथ खडसे

Aprna