HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचं म्हणणाऱ्याला पोलीसांनी केली अटक

पिंपरी | माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे तृतीयपंथी व्यक्तीसोबत समलैंगिक संबंध असल्याचा दावा करणाऱ्या एका व्हिडीओने खळबळ उडाली होती. विधानसभेतही याचे तीव्र पडसाद उमटले होते. फडणवीस यांनी तृतीयपंथी व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्यांच्याशी समलैंगिक संबंध ठेवले असल्याचा धक्कादायक आरोप पिंपरी-चिंचवड शहरातील युवराज दाखले या व्यक्तीने एका व्हिडिओतून केला होता. फडणवीसांविषयी आरोप करणाऱ्या युवराज दाखले याला वाकड पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर असलेला व्हिडीओ युट्यूबवर प्रसारित केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. जगतापनगर, थेरगाव येथे मंगळवारी (२ मार्च) हा प्रकार घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात काल (४ मार्च) गुन्हा दाखल झाला आहे.

युवराज दाखले असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह, अश्लील व बनामीकारक मजकूर असलेले वक्तव्य करून आरोपीने त्याचा व्हिडीओ युट्यूबवर प्रसारित केला. त्याबाबत आरोपीकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतानाही सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित केला.

त्यामुळे फिर्यादी आणि पक्षाच्या इतर कार्यकर्ते यांच्यात असंतोष व रोष निर्माण होऊन भावना दुखावल्या गेल्या, असे फिर्यादीत नमूद केले आहे. भारतीय दंड विधान कलम २९४, ५०० नुसार गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिसांनी आरोपी दाखले याला चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

अजित पवारांनी दिलं होतं कारवाईचं आश्वासन

फडणवीस यांच्याविषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे काल विधानसभेत पडसाद उमटले. याप्रकरणी भाजपाने संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन विधानसभेत दिले होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उस्मानाबादत बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यक- दीड हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Aprna

आदर्श सरपंच असलेल्या भास्कर पेरे पाटलांचा पराभव तर हिवरे बाजारमध्ये ३० वर्षांनी झाली निवडणुक

News Desk

कांजूर मेट्रो कारशेड प्रकरण : आदर्श वॉटर पार्कचा मालकी हक्क न्यायालयाने फेटाळला

Aprna