HW News Marathi
महाराष्ट्र

पेट्रोल दरवाढीवर कॉंग्रेसचं पुण्यात आंदोलन, थेट पेट्रोल पंपावर नेली घोडागाडी

पुणे | केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे त्यात महागाईचा त्रास सहन करावा लागत आहेत. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात कॉंग्रेसचं आज (७ जून) राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची घोषणा काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती.

इंधनाची अवाजवी दरवाढ करून मोदी सरकार देशातील जनतेची लूट करत आहे असा आरोप करत काँग्रेसच्या वतीने शहरातील ३५ पेट्रोल पंपांवर एकाच वेळी आंदोलन करण्यात आले. राज्यात १ हजार ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचे प्रदेश ऊपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले.कुलकर्णी पेट्रोल पंपाजवळ जोशी यांच्यासहीत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, नगरसेवक रविंद्र धंगेकर, बाळासाहेब अमराळे व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जोशी म्हणाले, मोदींच्या कारकिर्दीत पेट्रोलची ३५० टक्के तर डिझेलची ९०० टक्के वाढ झाली. यातून मिळालेले ८० हजार कोटी रूपये कुठे गेले याचा पत्ता नाही. मोदी सरकार देशाची लूट करत आहे हाच याचा पुरावा आहे. मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलनासाठी घोड्याची बग्गी आणली होती. त्यात बसून जोशी व पदाधिकार्यांनी मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंवेंद्रराजे आणि माझ्या भेटीत काही काळबेरं नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया

News Desk

#CoronaVirus | राज्यातील १ ली ते ८ वीच्या परीक्षा रद्द, शिक्षण विभागाचा निर्णय

News Desk

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा गेम प्लॅन तयार

News Desk