HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोलच्या किंमतीचा भडका; देशासह मुंबईत सामान्यांचा खिशाला कात्री

नवी दिल्ली | देशात पेट्रोल, डिझेलचा भडका उडाला आहे. १०० च्यावर पेट्रोलची किंमत गेल्याने नागरिकांचं जगणं मुश्किल झालं आहे.सरकारी तेल कंपन्यांनी आज (१७ जुलै) सकाळी पेट्रोलचे नवीन दर जारी केले आहेत. गुरुवारी इंधनाचे दर वाढवल्यानंतर शुक्रवारी दरवाढ झाली नाही. मात्र आज पुन्हा इंधनाचे दर वाढले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल ३० पैसे प्रतिलिटरने महागले तर मुंबईमधील पेट्रोलच्या दरात २९ पैशांनी वाढ झालीय. दिल्लीमध्ये आजपासून पेट्रोल १०१.८४ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. डिझेलच्या दरामध्ये काहीही बदल करण्यात आलेले नाही. डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहे. मुंबईमध्ये एका लिटर पेट्रोलसाठी आता १०७.८३ रुपये मोजावे लागत आहे.

राजधानी दिल्लीमध्ये मे महिन्यापासून आतापर्यंत ४१ वेळा इंधनदरवाढ करण्यात आली आहे. या ४१ दिवसांमध्ये पेट्रोल १०.७९ रुपयांनी तर डिझेल ८.९९ रुपयांनी महागले आहे. जुलै महिन्यामध्येच नऊ वेळा इंधनरदवाढ झाली आहे. मे महिन्यात १६ वेळा पेट्रोलचे दर वाढलेत. गुरुवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३५ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर १५ पैशांनी वाढ करण्यात आली होती. गेल्या ४ मेपासून पेट्रोलच्या दरात ४१ वेळा तर डिझेलच्या दरात ३७ वेळा वाढ करण्यात आली. देशामध्ये गुरुवारच्या आधी तीन दिवस इंधनाचे दर स्थिर होते. मात्र गुरुवारी त्यात वाढ करण्यात आली. शुक्रवारी दरवाढ झाली नाही. मात्र आज पुन्हा दरवाढ करण्यात आलीय. मागील दोन महिन्यांमध्ये देशातील इंधनाचे दर प्रती लीटरमागे दहा रुपयांनी वाढले आहेत.

चार मोठ्या शहरांमधील पेट्रोल, डिझेलचा भाव

>> दिल्ली – पेट्रोल १०१.८४ रुपये आणि डिझेल ८९.८७ रुपये प्रतिलिटर

>> मुंबई – पेट्रोल १०७.८३ रुपये आणि डिझेल ९७.४५ रुपये प्रतिलिटर

>> चेन्नई – पेट्रोल १०२.४९ रुपये आणि डिझेल ९४.३९ रुपये प्रतिलिटर

>> कोलकाता – पेट्रोल १०२.०८ रुपये आणि डिझेल ९३.०२ रुपये प्रतिलिटर

इतर शहरांमधील भाव

>> बेंगलुरु – पेट्रोल १०५.२५ रुपये आणि डिझेल ९५.२६ रुपये प्रतिलिटर

>> लखनऊ – पेट्रोल ९८.६९ रुपये आणि डिझेल ९०.२६ रुपये प्रतिलिटर

>> पाटणा – पेट्रोल १०४.५७ रुपये आणि डिझेल ९५.८१ रुपये प्रतिलिटर

>> भोपाळ – पेट्रोल ११०.२५ रुपये आणि डिझेल ९८.६७ रुपये प्रतिलिटर

>> जयपूर – पेट्रोल १०८.७१ रुपये आणि डिझेल ९९.०२ रुपये प्रतिलिटर

>> गुरुग्राम – पेट्रोल ९९.४६ रुपये आणि डिझेल ९०.४७ रुपये प्रतिलिटर

>> पुणे – पेट्रोल १०७.१० रुपये आणि डिझेल ९५.५४ रुपये प्रतिलिटर

>> नागपूर – पेट्रोल १०७.२० रुपये आणि डिझेल ९५.७६ रुपये प्रतिलिटर

>> नाशिक – पेट्रोल १०७.५० रुपये आणि डिझेल ९६.२३ रुपये प्रतिलिटर

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आईचे दूध मिळत नसल्याने दरवर्षी अडीच लाख बालकांचा मृत्यू

News Desk

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद

News Desk

आधार’ सर्वोच्च न्यायालयाकडून ‘निराधार’

News Desk