HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगाने निधन

मुंबई | भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. लक्ष्मण जगताप यांची कर्करोगाजी झुंज आज (3 जानेवारी) अखेर अपयशी ठरली. लक्ष्मण जगताप यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मण जगताप यांच्यावर पुण्यातील ज्युपिटर रुग्णलयात उपचार सुरू होते. लक्ष्मण जगताप यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत त्यांच्या घरी ठेवण्यात येणार असून सायंकाळी 7 वाजता पिंपळे गुरव येथे अंत्यविधी होणार आहे.

 

लक्ष्मण जगताप यांच्यावर गेल्या तीन वर्षापासून कर्करोगावर उपचार सुरू होते. याआधी लक्ष्मण जगताप यांनी परदेशात जाऊन त्यांनी कर्करोगावर उपचार घेतले होते.  परंतु, लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृती गेल्या 5-6 महिन्यांपासून अधिक गंभीर झाली होती. यामुळे लक्ष्मण जगताप हे वारंवार उपचारासाठी रुग्णालयात जात होते. लक्ष्मण जगताप हे पिंपरी-चिंचवडमधील तीन टर्म आमदार राहिले आहेत. लक्ष्मण जगताप हे कर्करोगाशी झुंज देत असताना 10 जून 2022 रोजी राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी ते रुग्णवाहिनेने मुंबई आले होते. तसेच विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबईत मतदान करण्यासाठी देखील आले होते.

 

लक्ष्मण जगताप यांचा अल्पपरिचय

लक्ष्मण जगताप यांनी 1986 सालापासून राजकीय कारकिर्दला सुरुवात केली होती. ते पहिल्यांदा 2002 नगरसेवक झाले होते. या काळात लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष होते. लक्ष्मण जगताप यांनी याच साली पुण्याचे महापौरही राहिले होते.  यादरम्यान लक्ष्मण जगताप यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले होते. लक्ष्मण जगताप यांनी 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले  आणि विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजयी झाले होते. यानंतर 2009मध्ये ते विधानसभेची निवडणूक लढवून आमदार झाले. आणि 2014 मध्ये तिसऱ्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून गेले होते. 2017 मध्ये पिंपरीचे शहराध्यक्ष पद देखील लक्ष्मण जगताप यांनी भूषविले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर अखेर मुख्यमंत्र्यांची सही, राजीनामा राज्यपालांकडे पाठवणार

News Desk

जयंत पाटील हे अनिल देशमुखांच्या घरचे वॉचमन आहेत का?, निलेश राणेंची घणाघाती टीका

News Desk

“शेतकरी आंदोलनात शेतकरी मृत्यूमुखी पडले तेव्हा मोदींचे अश्रू बाहेर पडले नाहीत”, राऊतांचा निशाणा

News Desk