HW News Marathi
देश / विदेश

#Coronavirus : पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना फोनकरून राज्याच्या परिस्थितीवर चर्चा

मुंबई | राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ वर पोहचली आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या १०७ वर गेला आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१५ मार्च) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. आणि केंद्राकडून सर्वोतोपरी सकार्य करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मोदींनी मुख्यमंत्र्यांना आज दुपारी फोन केला होता. या दोघांमध्ये जवळपास १५ मिनिटे राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्या आणि संशयित रुग्णांच्या माहिती घतली. राज्यात आज सकाळपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ३१ होती. मात्र, आज दुपारी औरंगाबाद येथील ५९ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. रशिया व कझाकिस्तानचा प्रवास करून ही महिला भारतात परतली आहे. सध्या औरंगाबादेतल्या धूत रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ३२ झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा- महाविद्यालये बंद

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्याकरिता राज्यशासनाने अत्यावश्यक पावले उचलली असून राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या यासोबतच सर्व मॉल्स ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या पुर्वनियोजित परिक्षा सुरु राहतील. ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरु राहणार असून स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. दैनंदिन गरजेसाठी किराणा दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या संकटाचा कुणीही दुरुपयोग करु नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (१४ मार्च) पत्रकार परिषदेतून केले.

राज्यात असा आहे कोरोनाग्रस्ताचा आकडा

  • पुणे – १५
  • मुंबई – ५
  • रायगड – १
  • कल्याण – १
  • अहमदनगर – १
  • नागपूर – ४
  • ठाणे – १
  • यवतमाळ – २
  • नवी मुंबई – १
  • औरंगाबाद – १

एकून – ३२

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता सरकारने मास्क, सॅनिटायझर्स रेशनच्या दुकानावर उपलब्ध करावेत !

News Desk

लोकसभेच्या लॉबीतच अरविंद सावंतांनी मला धमकावलं ! नवनीत राणांचा गंभीर आरोप

News Desk

जैविक इंधनावर भारताचे पहिले विमान उड्डाण यशस्वी

Gauri Tilekar