HW News Marathi
Covid-19

कोरोनाचा ग्रामीण भागात वेगाने फैलाव! मोदींचा सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली | ग्रामीण भागातही कोरोनाचा अतिवेगाने फैलाव होत असल्याचे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शेतकरी आणि ग्रामीण भागांतील नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला. देशातील शेतकरी आणि खेड्यांमधील नागरिकांना आपण पुन्हा एकदा करोनाच्या प्रादुर्भावाबद्दल दक्षता बाळगण्याचा इशारा देत आहोत. आता खेड्यांमध्येही फैलाव झपाट्याने होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पंतप्रधान मोदी यांनी काल २० हजार कोटींहून अधिक रकमेचा आठवा हप्ता वितरित केला. त्याचा ९.५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देशाच्या ग्रामीण भागांमध्ये वेगाने होत आहे, त्यामुळे जनतेने खबरदारी घ्यावी, मुखपट्ट्यांचा वापर करावा आणि फैलाव रोखण्यासाठी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मोदी यांनी केले आहे.

ग्रामीण भागात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे, त्याला आळा घालण्याचा प्रत्येक सरकार प्रयत्न करीत आहे, ग्रामीण भागात जनजागृती करणे आणि पंचायत संस्थांचे सहकार्य त्यासाठी महत्त्वाचे आहे, असे मोदी म्हणाले. वैद्यकीय क्षेत्र, शास्त्रज्ञ आणि सशस्त्र दले करोनाशी अहोरात्र लढत आहेत, देशांतर्गत उत्पादन आणि आयातीद्वारे औषधांच्या पुरवठ्यात वाढ केली जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले आहेत.

देश सध्या अदृश्य अशा कोरोना शत्रूशी लढत आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असून तिचा मुकाबला सरकार युद्धपातळीवर करीत आहे. या युद्धात आपलाच विजय होणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. आतापर्यंत करोना लशींच्या १८ कोटी मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि जनतेचे वेगाने लसीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही मोदी म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील कोरोना स्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी बोलावली केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

News Desk

“लॉकडाउन आवडे सरकारला”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

News Desk

पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला,१८ जणांना लागण..महाराष्ट्रात ४२ रूग्ण

Arati More