HW News Marathi
महाराष्ट्र

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर श्रीनिवास रेड्डीला अटक

अमरावती | वन अधिकारी दीपाली चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांच्या या आत्महत्या प्रकरणी अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. निलंबित अप्पर मुख्य प्रधान सचिव श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO विनोद शिवकुमार यांच्यासह निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनीही अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात होती. अखेर तपासाअंती धारणी पोलिसांनी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. धारणी पोलिसांनी आज पहाटे रेड्डी यांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी २५ मार्चला शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्य जीव परीक्षेत्रात त्या गेल्या दीड वर्षापासून RFO (वनपरिक्षेत्र अधिकारी) या पदावर कार्यरत होत्या. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर तिची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विनोद शिवकुमारला अटक केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर जावेद अख्तरना तालिबाननं चौकात फटके मारले असते”, सुधीर मुनगंटीवारांचा जावेद अख्तरांवर हल्ला

News Desk

विठ्ठल पुजेचा मान कुणाला मिळणार?

News Desk

“वाढदिवसानिमित्त विक्रम बनवता यावा म्हणून पंधरा दिवसांचे लसीकरण कमी करण्यात आले हे चुकीचे” – नवाब मलिक

News Desk