HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई पोलिसांविरोधात सोशल मीडियावर मोहीम चालवली – परमबीर सिंह 

मुंबई | मुंबई पोलिसांविरोधात ठरवून मोहिम चालवली गेल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटले आहे. आमची चौकशी ही प्रोफेशनल होती. AIIMS नेदेखील आत्महत्या असल्याचा अहवाल सीबीआयला दिला. यामध्ये आम्हाला कोणतही आश्चर्य वाटलं नसल्याचे ते म्हणाले आहेत.

अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या तपासात निघाला आहे. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करण्यात आला होता. सरकारच्या दबावाखाली मुंबई पोलीस काम करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मुंबई पोलिसांकडून हा तपास काढून घ्यावा आणि सीबीआयकडे द्यावा ही मागणी मान्य करण्यात आली होती.

मुंबई पोलिसांविरोधात एक मोहीम चालवली गेली. मात्र सत्य अखेर समोर आले. सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवून एक मोहीम चालवली गेली त्याबाबत चौकशी सुरू असून कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग म्हणाले आहेत. काही मीडियानंही मुंबई पोलिसांवर विरोधात एक मोहीम चालवली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सीताराम कुंटे साधे अधिकारी, आव्हाड-मलिक यांनीच अहवाल तयार करुन सही करायला लावली असेल”

News Desk

मिलिंद एकबोटे यांना गोरक्षकांकडून मारहाण

News Desk

महाराष्ट्रातील पोलिसांचा राष्ट्रपती पदक, शौर्य पदकांनी सम्मान

swarit