HW News Marathi
महाराष्ट्र

बारामतीमधील शरद पवारांच्या ‘गोविंदबाग’तील पोलीस बंदोबस्तात वाढ

बारामती । एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील शरद पवार यांच्या सिव्हर ओक हल्ला केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी

निवासस्थासमोर दगडफेक आणि चप्पल फेक करत मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत त्याच ठिकाणी आंदोलन केले. यानंतर आंदोलनकर्त्यांनी दगडफेक आणि चप्पल फेक करत मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग गोविंदबाग निसस्थानातील पोलिसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १०७ जणांना ताब्यात घेतले आहे. आज (८ एप्रिल) दुपारी अचानकपणे हा एसटी कर्मचाऱ्यांचा जमाव शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक घरावर हल्ला केला असून, त्यावेळी त्याठिकाणी केवळ दोन पोलीस कर्मचारी होते.ते या आंदोलकांना आवरू शकले नसल्याने,या कर्मचाऱ्यांनी जवळपास अर्धा तास याठिकाणी गोंधळ घातला.यावेळीच शरद पवारांच्या बंगल्यावर चप्पलफेक आणि दगडही फेकण्यात आले.

यी पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानी कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी पोलिसांचा बंदोबस्त मात्र वाढवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शांतता, स्थैर्य आणि सुरक्षेसाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद! – UNचे सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस

Aprna

दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहात काय? सामनातून अजित पवारांवर टीका

News Desk

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज शिवसेनेत पक्ष प्रवेश करत हाती शिवबंधन बांधणार

News Desk