HW News Marathi
देश / विदेश

संसदरत्न पुरस्कार ४ वेळा प्राप्त करणारे काँग्रेसचे खासदार राजीव सातव!

पुणे | काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या शरीरात सायटोमेगॅलो हा नवीन व्हायरस आढळला होता. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्या शरीरात या वायरसने शिरकाव केला. आणि त्यांची झुंज अपयशी ठरली. आज (१६ मे) पुण्यात राजीव सातव यांचे निधन झाले आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. कमी वयात राजकिय कारकीर्द भक्कम पार पा राजीव सातव यांच्या राजकिय प्रवासावर एक नजर टाकूया…

राजीव सातव यांचा राजकीय प्रवास कसा होता?

45 वर्षीय राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याकडे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं गुजरात प्रभारी पद होतं. तसंच काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे ते निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या.

राजीव सातव यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी लाटेतही विजय मिळवण्याची कामगिरी केली होती. त्यांनी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पराभूत केलं होतं.

राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पुढे 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान सातव यांच्यावर गुजरात प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्या निवडणुकीत काँग्रेसने चांगलं यश मिळवलं होतं.

पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली होती.

कॉंग्रेस आणि गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेमुळे त्यांच्यावर गुजरातच्या कॉंग्रेस प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युथ कॉंग्रेसचे अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे होते.

राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

४ वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळवणारे सातव

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

राज्यसभेवर सातव यांची वर्णी

राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

UGCच्या मार्गदर्शकांनुसार विद्यापीठ आणि उच्च शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार

News Desk

पंतप्रधानांनी मराठीतून दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

News Desk

दिल्ली सीमेवर असलेला खिळ्यांचा वेढा हा भारत-चीन सीमेवर हवा होता, राऊतांचा केंद्र सरकारला टोला

News Desk