HW News Marathi
महाराष्ट्र

भारतीय हॉकी संघावर होतोय कौतुकांचा वर्षाव!

मुंबई | भारतीय हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावलं आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक पटकावलं आहे. यावरून त्यांच्या या यशाचं आता सागेलच कौतुक करत आहेत. अनेक नेतेमंडळींनी ट्विट करत करत त्यांचा अभिनंदन केलं आहे.

जयंत पाटील यांनी भारतीय हॉकी संघाला दिल्या शुभेच्छा

तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात… अभिनंदन टीम इंडिया अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय हॉकी संघाचे कौतुक केले आहे. आज ४१ वर्षाने हॉकी संघाला कांस्यपदक मिळवता आले आहे. हॉकी संघाने मिळवलेलं हे यश भारतीयांचा उर भरून आणणारे आहे. त्यामुळे संघावर कौतुकाचा वर्षांव केला जात आहे. ट्वीटरच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय हॉकी संघाला आपल्या वेगळ्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

पंकजा मुंडेंकडून संघाचं कौतुक

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही भारतीय हॉकी संघाचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विट करत संघाचं कौतुक केलं आहे. ‘ऐतिहासिक विजय. आमच्या भारतीय पुरुषांच्या #हॉकी संघाचे अभिनंदन. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे’, असं ट्विट करत त्यांनी संघाचं कौतुक केलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठवाडा-विदर्भातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला

News Desk

पुणे शहरात पाणी साचू नये यासाठी आवश्यक कार्यवाही करा! – चंद्रकांत पाटील

Aprna

‘आम्हाला फक्त ब्रम्हज्ञान त्यांच्यासाठी कोरडे पाषाण’, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!

News Desk